Join WhatsApp group

Ads

कालनिर्णय कॅलेंडरमध्ये “महाराजा श्री अग्रसेनजी जयंती” चा उल्लेख करण्याची मागणी*

By Sarkarmzanews

August 12, 2026 4:31 pm

Ads

मूर्तिजापूर : देशभरातील अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत आणि महान समाजसुधारक *महाराजा श्री अग्रसेनजी यांची जयंती* सध्या लोकप्रिय *कालनिर्णय कॅलेंडरमध्ये नमूद केलेली नाही*.

या पार्श्वभूमीवर अग्रवाल समाजाच्या भावना लक्षात घेऊन अग्रवाल समाज समिती, मूर्तिजापूरने पुढाकार घेतला आहे.समितीचे अध्यक्ष *श्री. अनूप मौजिका* यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य लवकरच *कालनिर्णय व्यवस्थापनाला लेखी निवेदन* सादर करणार आहेत.

*प्रमुख मागणी काय आहे

समितीची प्रमुख मागणी आहे की, येणाऱ्या कालनिर्णय कॅलेंडरमध्ये “महाराजा श्री अग्रसेनजी जयंती” चा स्पष्ट उल्लेख* केला जावा. जेणेकरून देशभरातील अग्रवाल समाजाच्या श्रद्धेचा सन्मान होईल आणि महाराजांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक प्रमाणात होईल.

*महाराजा अग्रसेनजींचे योगदान*

*एक वीट आणि एक रुपया*” या तत्वावर समाजातील समानता आणि बंधुभावाचा पाया घालणाऱ्या महाराजा श्री अग्रसेनजींना कालनिर्णय कॅलेंडरमध्ये योग्य स्थान मिळणे ही संपूर्ण समाजासाठी गौरवाची बाब आहे, असे मत अध्यक्ष श्री. अनूप मौजिका यांनी व्यक्त केले.

त्यांनी पुढे सांगितले की, महाराजा अग्रसेनजींची जयंती देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. त्यामुळे कॅलेंडरमध्ये त्यांचा समावेश करणे ही काळाची गरज आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!