Join WhatsApp group

Ads

--

मुर्तीजापूरमध्ये कबड्डीचा थरार सुरू!५३व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्याचा माई सोशलचा संकल्प

By Sarkarmzanews

October 3, 2026 7:36 am

Ads

मुर्तीजापूर | प्रतिनिधी

मुर्तीजापूर शहराच्या क्रीडा इतिहासात कबड्डीला मोठी आणि गौरवशाली परंपरा लाभली आहे. या मातीत रुजलेला कबड्डीचा खेळ पुढील पिढीपर्यंत जिवंत ठेवत ग्रामीण व निमशहरी भागातील गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने ५३व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुले व मुली कबड्डी स्पर्धेचे काल सायंकाळी ६ वाजता श्री गाडगे महाराज विद्यालय, मेन रोड, मुर्तीजापूर येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.कै. मारुतीआप्पा विठ्ठलआप्पा पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याने मुर्तीजापूरच्या क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली.

उद्घाटनानंतर मैदानावर युवा कबड्डीपटूंच्या दमदार चढाया, पकडी आणि गुणांसाठीची चुरस सुरू होताच संपूर्ण क्रीडांगण कबड्डीच्या जल्लोषाने दणाणून गेले.

मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा पर्वाला सुरुवात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री सुहास रावजी तिडके, माजी आमदार तथा अध्यक्ष, गाडगे महाराज विद्यालय मंडळ, मुर्तीजापूर होते. कार्यक्रमाच्या आयोजक तथा मार्गदर्शक माननीय श्रीमती दुर्गाताई मारुतीआप्पा पिंपळे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मा. जितेंद्र सिंह ठाकुर सर, महासचिव कबड्डी महासंघ तथा अध्यक्ष अॅम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, तसेच माननीय श्री अॅडव्होकेट मोती सिंग मोहता, ज्येष्ठ विधीतज्ञ तथा अध्यक्ष, १२ असोसिएशन महाराष्ट्र अँड गोवा यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय श्री सतीश चंद्रभान, जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला, माननीय श्री धर्मेंद्र जोशी, ठाणेदार, मुर्तीजापूर शहर, माननीय सुरेखाताई जगन्नाथ कडू, सचिव, अॅम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ, जतिन हरिया, ज्येष्ठ उद्योजक, माननीय श्री राजेंद्र नेमाडे, वैद्यकीय अधीक्षक, मुर्तीजापूर, माननीय श्री सुनीलजी कांबळे, अध्यक्ष, बार असोसिएशन, मुर्तीजापूर, माननीय श्री अभय कदम, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुर्तीजापूर, माननीय श्री अॅडव्होकेट त्रंबकेश्वरज्ञ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय विनायकराव गुल्हाने, ऋषिकेश गावंडे सर, क्रीडा अधिकारी, दुबे सर, क्रीडा अधिकारी, अनिल आठवणी, ज्येष्ठ समाजसेवक, किशोर ठाकूर, समाजसेवक, सागर सावरी, समाजसेवक, भारत जेठवाणी, समाजसेवक, अमोल प्रजापती, समाजसेवक, राजूभाऊ दहापुते, माजी ज्येष्ठ कबड्डी खेळाडू, पूजाताई पिंपळे, मुकेश काळपांडे, विनोद काळपांडे आणि दिवाकर सुरजुसे यांचीही उपस्थिती लाभली.

विदर्भातील कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थितस्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील कबड्डी संघटनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये श्री अशोक भाऊ देशमुख, सचिव, बुलढाणा, श्रीराम भाऊजींना, अध्यक्ष, वाशिम, नंदू भाऊ वानखडे, सचिव, यवतमाळ, प्रदीप सेतुकार, सचिव, नागपूर, प्रशांत करळ भाजणे, सचिव, चंद्रपूर शहर, श्री राजेंद्र गडगिलवार, सचिव, गडचिरोली, रवींद्र कोळपे, सचिव, चंद्रपूर ग्रामीण, राजेंद्र नेरकर, अकोला शहर सचिव, मंगलसिंग ठाकूर, सचिव, अकोला ग्रामीण, केशवराव पातोंड साहेब, अध्यक्ष, अकोला शहर, निखिल बुंदुले, सचिव, अमरावती, वासुदेव नेरकर, विनायक वाघाये, पद्माकर देशमुख, स्पर्धा निरीक्षक, लाला राऊत तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कबड्डीच्या क्षेत्रातील अनुभवी पदाधिकारी, क्रीडा अधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत युवा खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

मुर्तीजापूरची कबड्डीची परंपरा जपण्याचा संकल्प

मुर्तीजापूर आणि परिसराला कबड्डीच्या खेळाची मोठी परंपरा लाभली आहे. या शहरातील अनेक खेळाडूंनी कबड्डीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली असून, या परंपरेला खंड पडू नये आणि नव्या पिढीतील खेळाडूंना योग्य संधी मिळावी, यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाने पुढाकार घेतला आहे.

कै. मारुतीआप्पा विठ्ठलआप्पा पिंपळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ही स्पर्धा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासोबतच मुर्तीजापूरच्या कबड्डी संस्कृतीला पुढे नेणारा उपक्रम ठरत आहे.

मैदानावर खेळणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूच्या माध्यमातून कबड्डीची ही परंपरा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न या आयोजनातून होत आहे.महाराष्ट्राच्या संघ निवडीकडे खेळाडूंचे लक्ष२ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मुला-मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या ज्युनिअर राज्य कबड्डी संघाच्या निवडीची संधी मिळणार असल्याने खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आहे.राज्यस्तरीय निवड चाचणी असल्याने प्रत्येक सामना खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरणार असून, मैदानावर चढाई, पकड, बचाव आणि सांघिक डावपेचांची खरी कसोटी पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालनकार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर टाले सर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे उद्घाटन सोहळ्याला रंगत आली.

मुर्तीजापूरच्या मातीत रुजलेली कबड्डीची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित या स्पर्धेमुळे शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस गाडगे महाराज विद्यालयाचे मैदान युवा कबड्डीपटूंच्या कौशल्याने गाजणार आहे.

क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, मुर्तीजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Article

अग्रसेन जयंती निमित्त मूर्तिजापुरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व… संजय एम.देशमुख कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!