Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर नगरपरिषद निवडणूक : परंपरागत राजकारणाला छेद, सत्ता-समीकरणे नव्याने, अनपेक्षित घडण्याची शक्यता?

By Sarkarmzanews

December 25, 2025 5:04 pm

Ads

दिनांक २५ : मुर्तीजापूर नगरपरिषद निवडणूक संपली. मतदान झाले, निकाल लागले. पण राजकारण मात्र अजूनही थांबलेले नाही. उलट, सत्तास्थापनेच्या हालचालींना आता खरी धार आली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची राहिली नाही, तर संपूर्ण शहराच्या राजकीय समीकरणांना हादरा देणारी ठरली. तसेच येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत सिमिती निवडणुकांवर याचे परिणाम काय? हि निवडणूक अनेक राजकीय राज ठेवून अनेक प्रश्नांना जन्म देणार आहे का?

राजकारणाने कुटुंबे फोडली… पण या निवडणुकीत कुटुंबे जोडली गेली! योगायोग की रणनीती कि एका नेत्याची माणुसकी ?

आजवर मुर्तीजापूरच्या राजकारणाने अनेक कुटुंबे विभागली. स्वार्थ, वर्चस्व आणि सत्तेसाठी भाऊ-भाऊ विरोधात उभे राहिले. मात्र या निवडणुकीत चित्र उलटे झाले.

अव्वलवार कुटुंब आणि कांबे कुटुंब — अनेक वर्षे राजकीय लाभासाठी एकमेकांपासून दूर असलेली ही दोन प्रभावशाली घराणी अचानक एकत्र आली.

हा चमत्कार झाला कसा?
स्वतःहून समजूत झाली की राजकीय हस्तक्षेप करून हे कोणी घडवून आणले का ?

स्थानिक राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे —
“हे कुटुंब एकत्र येणे भावनिक व राजकीय होते… आणि त्या राजकारणाचा सूत्रधार एकच होता का ?”

निवडणूक जिंकलीच, पण सत्ता कोण ठरवणार ?

भाजपचे ११ नगरसेवक, अपक्ष आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन होण्याच्या हालचाली वेगात आहेत.
नगराध्यक्ष जुनी वस्तीचा, उपाध्यक्ष स्टेशन परिसरातील — हे मागील राजकारण नव्याने परत लिहिले जात आहे.

रोहित अव्वलवार यांना उपाध्यक्ष पद मिळण्याची चर्चा केवळ योगायोग आहे का? शहराची भौगोलिक परिस्थितिचा डाव की हा देखील पूर्वनियोजित सत्ता-संतुलनाचा भाग आहे?

वंचित : विरोधात, पण सत्ता केंद्रावर डोळा?

वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे विरोधी बाकावर बसणार. पण एक स्वीकृत नगरसेवक पर्याय आज पण वंचित जवळ दिला गेला आहे व त्यासाठी गुप्त बैठकी सुद्धा सुरु आहे.

मात्र प्रश्न असा आहे — ही संधी वंचितला मिळत असली तरी अटी-शर्तींच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक पर्याय वंचितचा हातातून निसटणार का ?

शिंदे गट : गद्दारीचा हिशेब चुकवता येतो का?

शिंदे गटासाठी ही निवडणूक धोक्याची घंटा ठरते आहे.

  • सत्ता केंद्राचा दोन लाडके भाजपविरोधात उघड लढले.
  • दोन नगरसेवक सत्तेच्या आता बाहेर राहणार का ?
  • एका नगरसेवकाचे पद धोक्यात ?
  • एका उमेदवाराच्या भावाचा अतिउत्साहीपणा अडचणी वाढवणारा.

प्रश्न स्पष्ट आहे —
भाजपसोबत गद्दारी करून मिळवलेले नगरसेवक पद आता महागात पडणार का?

आणि या राजकीय धड्याचा शिक्षक कोण? नव्याने पक्षात आलेला कोणीतरी ?

खानदानी राजकारण मोडीत काढले — कुणी?

मुर्तीजापूरमध्ये पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले खानदानी राजकारण या निवडणुकीत कोसळले.
अनेक मात्तबर नेते निकालानंतर राजकीयदृष्ट्या निष्क्रिय झाले.

म्हणूनच सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला —
“काय रे हरी, चांगल्या-चांगल्यांना पाठवलंस घरी !”

हा उपरोध नाही, तर राजकीय वास्तवाची कबुली आहे का?

भाजपची अंतर्गत गटबाजी पडली महागात ?

प्रभाग क्रमांक १२ सह काही प्रभागांत भाजप उमेदवार हरले. कारण — अंतर्गत गटबाजी.
पण तरीही आमदार हरीश पिंपळे यांनी वरिष्ठांना दिलेला पाडला का नाही
भाजप १५–१६ नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कमी कोठे पडली?

मग प्रश्न उरतो —
ही अपयशे अपघाती झाली की मोठ्या गटबाजी मुळे?

किंगमेकर कोण? हे आता लपून राहिलेले नाही

मुर्तीजापूर नगरपरिषद निवडणूक संपली असली, तरी
खरे राजकारण आता सुरू झाले आहे.

कुटुंबे जोडणे, समीकरणे बदलणे, विरोधकांना कोपऱ्यात ढकलणे,
आणि सत्ता आपल्या परिघात ठेवणे — हे सर्व योगायोगाने घडले? की एका व्यक्तीच्या नियोजनामुळे?

प्रश्न अखेर एकच आहे —
हे सर्व घडले या निवडणुकीची स्क्रिप्ट कोणी लिहिली होती ? कि झालेल्या व येणाऱ्या समस्यांची पर्यायी व्यवस्था ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!