Join WhatsApp group

Ads

अकोल्यातील गुलाब नगर परिसरात अवैध पेट्रोल साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkar Maza

June 29, 2026 6:35 pm

Ads

अकोला, दि. 29 जून : अकोला शहरातील गुलाब नगर परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवून ठेवलेले 120 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले असून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 29 जून 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माननीय पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वीरेंद्र खेरडे, शेख असलम, महिला पोहेकॉ निशा वाकडे तसेच पोलीस अंमलदार सुनील रिठे यांनी दोन पंचांसमक्ष गुलाब नगर, जुने शहर अकोला येथे छापा टाकला.या कारवाईदरम्यान सईदा बी अब्दुल रशीद (वय 44 वर्ष, रा. गुलाब नगर, जुने शहर, अकोला) हिच्या ताब्यातून पाच कॅनमध्ये साठवून ठेवलेले एकूण 120 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 13 हजार 200 रुपये इतकी आहे.सदर प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध आवश्यक कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!