Join WhatsApp group

Ads

-

शेतकऱ्यांचा हिता साठी आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव कंझरा गावात.

By Sarkarmzanews

January 23, 2025 5:02 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक  २३ : आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव यांनी कंझरा गावाला एक दिवसीय भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या पीक उत्पादकता आणि शेती खर्चासंबंधीच्या समस्यांवर चर्चा केली.

प्रोफेसर गौरव आणि त्याचा पीएचटी विद्यार्थी राहुल कंझारा गावात सोशल नेटवर्क्स आणि कृषी उत्पादकता यांच्यातील संबंधांवर अभ्यास करत आहेत. हा अभ्यास ICRISAT च्या पूर्वीच्या अभ्यासाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या समजून घेणे आणि धोरण निर्मात्यांना सूचित करणे हा आहे.

या भेटीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात मदत होणार असून धोरणकर्त्यांना शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्यास मदत होणार आहे.

उल्लेखनीय आहे की प्राध्यापक सार्थक गौरव यांनी यापूर्वी विदर्भाचा अभ्यास केला होता आणि "एक्सीडेंटल गैंबलर्स: रिस्क एंड वल्नरेबिलिटी इन विदर्भ" हे पुस्तक लिहिले होते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी यांनी केलेला अभ्यास शेतकऱ्यांचा हिता साठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!