Join WhatsApp group

भातकुली पोलीस ठाण्यात ‘रन फॉर युनिटी’ उत्साहात संपन्न सामाजिक व क्रीडा एकतेचा संदेश देत शेकडो नागरिकांचा सहभाग

Photo of author

By Sarkarmzanews

Share

भातकुली (अमरावती) │ भारताचे पहिले गृहमंत्री व लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने आज, दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन भातकुली तर्फे “रन फॉर युनिटी” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र समिती सदस्य, शालेय विद्यार्थी, क्रीडा मंडळाचे खेळाडू, आय.टी.आय. शाळा व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, तसेच विविध धर्म, जाती आणि समाजाचे नागरिक व पत्रकार बांधव यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत देशाच्या अखंडतेचा संदेश दिला. त्यानंतर ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनची सुरुवात पोलीस स्टेशन भातकुली येथून करण्यात आली. ही धाव छोगालाल राठी विद्यालय, बस स्टँड, हरताळा फाटा, वाल्मिकी चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात परत आली आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या निमित्ताने विभागीय, जिल्हा तसेच राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकता, क्रीडा भावना आणि राष्ट्रप्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!