Join WhatsApp group

Ads

अग्रसेन जयंती निमित्त मूर्तिजापुरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

By Sarkarmzanews

October 3, 2026 7:29 am

Ads

युवक-युवतींच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान — ११ ऑक्टोबरला भव्य शोभायात्रा

मूर्तिजापूर : प्रतिनिधीअग्रवाल समाजाचे आराध्य दैवत तथा अग्रवंशाचे प्रवर्तक महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर अग्रवाल समाजाच्या वतीने २ ते ११ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा, सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव व्हावा, या उद्देशाने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जयंती महोत्सवाच्या प्रारंभी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी अग्रवाल समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अग्रसेन भवन रोडवर स्वच्छता मोहीम

अग्रसेन जयंतीच्या पार्श्वभूमीवर अग्रसेन भवन रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची दुरुस्ती तसेच दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली.

आमदार हरीष भाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष हर्षल भाऊ साबळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तातडीने दखल घेत ही मोहीम राबविली. यावेळी मुख्याधिकारी निलेश जाधव, नगरसेवक भारत (टोनी) जेठवानी, समाजसेवक बबलू भेलोंडे यांच्यासह नगरसेवक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

अग्रसेन जयंतीच्या पार्श्वभूमीवर रस्ता स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीचे अग्रवाल समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

युवक-युवतींसाठी विविध स्पर्धा

जयंती महोत्सवांतर्गत युवक-युवतींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच विजेत्यांना ११ ऑक्टोबर रोजी अग्रसेन भवन येथे समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

शाकंभरी चौकातून निघणार भव्य शोभायात्रा

महाराजा अग्रसेन जयंतीच्या मुख्य दिवशी, रविवार ११ ऑक्टोबर रोजी स्टेशन विभागातील माँ शाकंभरी चौकातून महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व आरती करून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणारी शोभायात्रा पोळा चौक, रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे अग्रसेन भवन येथे पोहोचणार असून, तेथे शोभायात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

युवकांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना चालना देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.अग्रसेन जयंती महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, संस्कार आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये अग्रवाल समाजातील बंधू-भगिनी, युवक-युवती व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अग्रसेन भवन समिती व अग्रसेन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Article

अग्रसेन जयंती निमित्त मूर्तिजापुरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व… संजय एम.देशमुख कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!