Join WhatsApp group

Ads

आयआयटी बॉम्बे येथून हिया अग्रवाल यांनी Honors सहित B.Tech. पदवी संपादन

By Sarkarmzanews

August 27, 2026 7:29 am

Ads

मूर्तिजापूर : स्थानिक भूत परिवारातील कु. हिया राजेश अग्रवाल (भूत) यांनी देशातील नामांकित IIT बॉम्बे येथून Civil Engineering मध्ये Honors सहित B.Tech. पदवी यशस्वीरीत्या संपादन करून उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे भूत परिवारासह मूर्तिजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. हिया अग्रवाल या मूर्तिजापूर निवासी श्री. विजयकुमार नथमल अग्रवाल (भूत) यांच्या सुपौत्री असून श्री. राजेश विजयकुमार अग्रवाल (भूत) यांच्या कन्या आहेत.

IIT बॉम्बे सारख्या देशातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थेत शिक्षण घेत Civil Engineering मध्ये Honors सहित B.Tech. पदवी प्राप्त करणे ही त्यांच्या मेहनत, सातत्य, शिस्त आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे.हिया यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भूत परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शुभचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

मूर्तिजापूरमधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

कामगिरीप्रतिष्ठित IIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून Honors सहित पदवी संपादन करणारी हिया अग्रवाल यांची कामगिरी मूर्तिजापूरमधील विद्यार्थी आणि पालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर स्थानिक विद्यार्थीदेखील देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे हिया यांच्या कामगिरीने अधोरेखित केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!