Join WhatsApp group

Ads

लाच प्रकरण विसरलं गेला का? अनभोरा येथे पुन्हा अवैध दारू विक्री जोरावर सुरू

By Sarkar Maza

May 22, 2026 8:31 pm

Ads

मुर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा गावात पुन्हा एकदा अवैध दारू विक्रीने डोके वर काढल्याचे चित्र समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी याच गावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईदरम्यान एका बीट जामदाराला लाच घेताना पकडण्यात आल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणानंतर काही काळ शांत असलेला अवैध व्यवसाय आता पुन्हा खुलेआम सुरू झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.

गावाच्या मध्यवर्ती भागातच देशी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विशेषतः महिला वर्ग या प्रकारामुळे संतप्त असून, गावातील वातावरण बिघडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संध्याकाळच्या वेळेस दारू पिऊन होणारे वाद, शिवीगाळ आणि दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात संदीप व प्रदीप हे अवैध दारू विक्री करत असल्याची चर्चा असून, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत.

त्यामुळे “हा धंदा नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.यापूर्वी इथल्या एका बीट जामदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडण्यात आलेल्या घटनेमुळे पोलिस विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात होते.

त्यामुळे आता पुन्हा एखाद्या अधिकाऱ्याला “हफ्त्याच्या वादातून” अडकवण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना? अशीही चर्चा परिसरात सुरू आहे.

मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावातील महिला व नागरिकांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!