Join WhatsApp group

Ads

--

वेलकम? गुटखा विक्री जोमात अन्न प्रशासन कोमात

By Sarkarmzanews

December 6, 2024 12:25 pm

Ads

न्यूज डेस्क : अकोला दिनांक ०६ : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही अकोला जिल्ह्यात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे, परंतु अकोला जिल्ह्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखा शहरात पोहचतात . गुटख्याच्या पुड्यांच्या माळा ट्रक मध्ये खचाखच भरलेल्या असतात. रातोरात गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी- चारचाकीतून घेऊन जातात. तसेच एका ठिकाणी याचा काहीसा साठा करून ठेवला जातो. हाच साठा काही दिवस परिसरातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो.

जिल्ह्या मध्ये गावो गावी ठिकठिकाणी पान टपर्यांवर, किराणा दुकानंवार, सहज उपलब्ध होताना दिसत आहे, तसेच गुटख्याच्या रिकाम्या पुड्या रस्त्यावर दिसून येतात. तर सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहेत.

अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? असा प्रश्न अनेकाकडून उपस्थित केला जात आहे.

गुटख्याची उपलब्धी सहज मुबलक

जागोजागीच्या काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परंतु गुटखा मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!