Join WhatsApp group

Ads

---

हरित शहराचा फसवा दावा : निकृष्ट कामाचा नमुना, उद्याने कुलूपबंद, जनतेचा पैसा वाऱ्यावर!

By Sarkar Maza

March 1, 2026 3:41 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०१ : उद्याने ही केवळ सौंदर्यवर्धनासाठी नसून ती शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानली जातात. नियमित व्यायाम, सकाळ-संध्याकाळ फेरफटका, मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास, सामाजिक संवाद वाढवणे — या सर्व गोष्टी उद्यानांमुळे शक्य होतात.

शहराच्या सौंदर्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली नगरपरिषदेची उद्याने आज अक्षरशः ओसाड पडली आहेत.

काही उद्यानांच्या गेटला कायमस्वरूपी कुलूप लावलेले आहे, तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुटलेली खेळणी आणि कमरेएवढे वाढलेले गवत अशी भयावह स्थिती दिसून येते.

‘विकासा’च्या गाजावाजात झालेले लोकार्पण आता केवळ फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचा उपयोग शून्य आहे.

लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही बागा नागरिकांसाठी नव्हे, तर कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच उभारल्या गेल्या का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

काही ठिकाणी फरशा उखडलेल्या, पाण्याची योग्य निचरा व्यवस्था नसल्याने चिखल, तर बाके मोडकळीस आलेली आहेत. लहान मुलांसाठी बसवलेली खेळणी काही महिन्यांतच निकामी झाली आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उद्यानांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे देखभालीचा पूर्ण अभाव. साफसफाई नाही, सुरक्षारक्षक नाही, लाईट व्यवस्था बंद — परिणामी काही उद्याने असामाजिक घटकांचे अड्डे बनण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

नगरपरिषदेकडून निधी खर्च झाला, कामाचे बिल पास झाले; पण प्रत्यक्ष देखभाल आणि जबाबदारी कोणाची? जनतेच्या करातून उभारलेल्या या सुविधांची अशी दुर्दशा म्हणजे सरळसरळ आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण करणारी बाब आहे.

नागरिकांची मागणी स्पष्ट आहे —

🔹 सर्व उद्यानांची तात्काळ पाहणी करावी

🔹 निकृष्ट कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी

🔹 नियमित देखभाल व सुरक्षा व्यवस्था सुरू करावी अन्यथा ‘हरित शहर’च्या घोषणा फक्त कागदावरच राहतील आणि उद्याने मात्र कायमची कुलूपबंदच!

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!