Join WhatsApp group

Ads

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळातर्फे स्तंभपूजन

By Sarkarmzanews

September 27, 2026 6:49 pm

Ads

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरातील सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळातर्फे स्तंभपूजन करून यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला विधिवत सुरुवात करण्यात आली.

धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात स्तंभपूजनाचा कार्यक्रम पार पडला.नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

उत्सवासाठी आकर्षक सजावट, रोषणाई तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.

स्तंभपूजनाच्या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सव शांतता, शिस्त, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरातील धार्मिक वातावरणाला चैतन्य येणार असून, मंडळाच्या विविध उपक्रमांकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!