Join WhatsApp group

प्रत्येक नागरिकाच्या विकास साठी काम करणारी सरकार – आमदार सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०१: अकोला: विधायक सावरकर अकोला ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केले आहे त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच समाजाला दिशा देण्याचे काम ज्येष्ठ नागरिक करीत असतात त्यांच्या अनुभव समाज संघटना व परिवारासाठी महत्त्वपूर्ण असून त्यांच्या आरोग्याची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून पंतप्रधान आयुष्यमान योजनेची वय मर्यादा वाढ केली आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सुद्धा त्यांच्या भावना ओळखून अनेक योजना निर्माण केल्या त्याचा लाभ घ्यावा अकोल्यात असलेल्या त्यांच्या समस्या आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज रामदास पेठ येथील टिळक पार्क ला भेट देऊन लोकमान्य जेष्ठ नागरीक संघ, यांच्या योग शिबिरास भेट दिली.

जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.यावेळी जेष्ठ नागरिकांशी दिलखुलास पारिवारिक वातावरणात चर्चा व अकोला शहरातील विविध समस्या व मार्गदर्शन आमदार रणधीर सावरकर यांनी जाणून घेतल्या. त्यांच्या सूचना मार्गदर्शन समाज आणि राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण असल्याचीही आमदार सावरकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजना च्या माध्यमातून खासदार अनुप धोत्रे सातत्याने कटिबद्ध असून व राज्यशास्त्राच्या समस्या निराकारण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी डॉक्टर सुहास काटे, सौ सुनीता कावळे ,लोकमान्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किरण चौक, उपाध्यक्ष चंद्रशेखर फुलझेले, सचिव श्रीकांत चाळीसगावकर, कोषाध्यक्ष प्रदीप बांधवरकर, ॲड मिलिंद उंटवाले तसेच महानगर सरचिटणीस ॲड देवाशिष काकड, माधव मानकर, राजेंद्र गिरी, सौ सारिका जयस्वाल, सौ निकिता देशमुख, प्रकाश घोगलिया, सागर शेगोकार, संदीप गावंडे, राजेश चौधरी, हरीश काळे, विवेक भरणे, पवन महल्ले , अमित चाळीसगावकर, उमेश श्रीवास्तव, शिवलाल इंगळे मोहन गावंडे रुपेश जयस्वाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!