Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुरात ‘गोल्डन’ सोहळा… राहुल महाजनांनी जिंकली सगळ्यांची मनं!

By Sarkar Maza

March 25, 2026 4:39 pm

Ads

मुर्तीजापुर | प्रतिनिधी: आजच्या काळात आई-वडील म्हटलं की, अनेक जण जबाबदारी टाळतात… काही जण तर त्यांना ओझं समजतात. पण मुर्तीजापुरच्या राहुल महाजनांनी सगळ्यांना आरसा दाखवलाय!

आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस… आणि तोही असा साजरा केला की, पूर्ण शहर बघत राहिलं!

सुवर्ण महोत्सव की ‘राजेशाही’ सोहळा?

राहुल महाजनांनी आपल्या आई-वडिलांच्या ५० वर्षांच्या संसाराचा ‘सुवर्ण महोत्सव’ असा काही साजरा केला की, तो फक्त कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही—तो एक इव्हेंट

भव्य सजावट, शानदार आयोजन आणि उत्साहाने भरलेलं वातावरण… मुर्तीजापुरमध्ये याआधी असं काही पाहिलं गेलं नव्हतं.

“आई-वडीलच खरे देव” — कृतीतून दिला संदेशफक्त बोलणं नाही, राहुल महाजनांनी करून दाखवलं!“ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांच्यासाठी एक दिवस नाही तर आयुष्यही कमी आहे,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

शहरभरातून कौतुकाचा वर्षाव

या सोहळ्याला शहरातील मान्यवर, नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकच चर्चा — “मुलगा असावा तर राहुल महाजनांसारखा!”

पुढच्या पिढीसाठी मोठा धडाहा फक्त वाढदिवस नव्हता… हा एक मेसेज होता!आई-वडिलांना वेळ द्या, त्यांचा सन्मान करा… कारण शेवटी तेच आपलं खरं ‘रूट’ आहेत.

राहुल महाजनांनी जे पेरलंय, ते उद्या समाजात नक्कीच मोठं झाड होणार… आणि कदाचित अनेक मुलांना विचार करायला भाग पाडणार!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!