Join WhatsApp group

Ads

-

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

By Sarkar Maza

June 30, 2026 6:42 pm

Ads

अमरावती व अकोला जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी अवैध सावकारांच्या विळख्यात अडकत असून त्यांची या जाचातून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.

सभागृहात बोलताना पिंपळे यांनी सांगितले की, सरकारकडे परवानाधारक सावकारांची नोंद असली तरी प्रत्यक्षात हजारो शेतकरी विना-परवाना सावकारांकडून अवाच्या सव्वा व्याजदराने कर्ज घेण्यास भाग पडत आहेत.

हे अवैध सावकार चिठ्ठीवर व्यवहार करून कोणताही अधिकृत हिशेब ठेवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असून अनेक कुटुंबे संकटात सापडत आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अवैध सावकारांविरोधात तक्रार करता यावी आणि त्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी राज्यव्यापी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी सरकारसमोर तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले:

अवैध सावकारांच्या त्रासातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी राज्यव्यापी हेल्पलाईन सुरू करणार का?

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठन करून त्यांना अडचणीत आणणाऱ्या बँकांवर कारवाई होणार का?

अवैध सावकारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलणार?

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपला संघर्ष कायम राहणार असल्याचेही आमदार हरीश पिंपळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीमुळे राज्यातील अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत ऐरणीवर आला असून, सरकार याबाबत कोणता निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Article

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

अकोल्यात खळबळ! भररस्त्यात याकूब पहलवान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला; उपचार दरम्यान मृत्यू

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

अकोल्यातील गुलाब नगर परिसरात अवैध पेट्रोल साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

दोनद येथे अंघोळीसाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून अंत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!