Join WhatsApp group

Ads

रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व… संजय एम.देशमुख कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

By Sarkarmzanews

October 3, 2026 7:23 am

Ads

कुरणखेड : नैसर्गिक आपत्तीत आणि अपघातांच्या संकटात सापडलेल्या निराश्रीतांच्या मदतीला धावून जाणे आणि रक्त संकलनाच्या उपक्रमातून संकटग्रस्त अनेक जीवांना जीवदान देण्याचे हे मानवतावादी कार्य असून हेच खऱ्या देवत्वाचे दर्शन आहे.

अनेकांना आयुष्यात संरक्षण देणारे उदात्त सेवाभावी कार्य आहे.अशी ध्येयवादी वाटचाल करणारे वीर भगतसिंग आपात्कालीन शोध व बचत पथकाचे अध्यक्ष योगेश विजयकर आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत‌.असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.

येथून जवळच असलेल्या कुरणखेड येथे सामाजिक मदत उपक्रमात क्रांतीकारी सहभाग दर्शवणाऱ्या धाडसी सेवाभावी युवकांच्या वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचत पथक या समुहाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

त्याच्या उद्घाटन समारंभाला आमदार हरिष पिंपळे, लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार पिंपळे दिप प्रज्वलन करून गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात लोकस्वातंत्र्य पदाधिकाऱ्यांनी या सेवाभावी युवकांचे आपल्या मनोगतातून अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.या पथकाकडून अनेक वर्षांपासून क्रांतीकारी शाहिद भगतसिंग यांचे जयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होत असून,मागील वर्षी ७० बाटल्या व यावेळी १०० बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे या पथकाचे योगेश विजयकर यांनी यावेळी सांगीतले.याप्रसंगी या बचत पथकाकडून संजय देशमुख व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाच्या व साई जीवन ब्लड बॕंकेच्या डॉक्टरांनी रक्त संकलनासाठी सेवा दिली.

या रक्तदान शिबिराला उदघाटक म्हणून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे,तर प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख होते.

याप्रसंगी लोकस्वातंत्र्य राष्ट्रीय पदाधिकारी कादंबरीकार पुष्पराज गावंडे,जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक पंजाबराव वर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन भटकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश समुद्रे, पत्रकार महासंघाचे जिल्हा संघटक श्रीकृष्ण माळी, ज्येष्ठ पत्रकार पदाधिकारी रमेश समुद्रे अमित इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन योगेश विजयकर यांनी केले.

Related Article

अग्रसेन जयंती निमित्त मूर्तिजापुरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व… संजय एम.देशमुख कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!