Join WhatsApp group

Ads

-

दिवाळीच्या तोंडावर अन्न प्रशासनाचा दणका!अकोल्यात १९०० किलो मिष्टान्नसाठा जप्त; ५.७२ लाखांच्या साठ्यावर कारवाई

By Sarkarmzanews

October 6, 2026 8:47 am

Ads

अकोला : प्रतिनिधी

गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी अकोला शहरातील रायलीजिन येथील Arco Transport येथे तपासणी केली असता अहमदाबाद (गुजरात) येथून अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत वाहतूक करण्यात आलेला विविध ब्रँडच्या मिठाईचा मोठा साठा आढळून आला.

या कारवाईत तब्बल १,९०० किलो वजनाचा आणि अंदाजे ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता Arco Transport येथे तपासणी करण्यात आली. यावेळी अहमदाबाद, गुजरात येथून MP 09 HQ 5004 आणि MH 28 AB 7882 या ट्रकद्वारे आणण्यात आलेला विविध प्रकारच्या मिठाईचा साठा आढळला.

या साठ्यामध्ये स्वीट हलवा (अंबिका), ट्रॅडिशनल स्वीट (GWAL), हलवा (Shri Gwal), रिच स्वीट (अंबिका), ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट या पदार्थांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.सदर अन्नपदार्थांची नियमित पद्धतीने अन्न नमुने घेण्यात आले असून, उर्वरित १,९०० किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला माल अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत Biogas Project, SWM Processing Plant, भोड येथे नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

सदर माल मागविणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.ही कारवाई मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेचे सहायक आयुक्त देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली.

अन्नपदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असून, या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Article

दिवाळीच्या तोंडावर अन्न प्रशासनाचा दणका!अकोल्यात १९०० किलो मिष्टान्नसाठा जप्त; ५.७२ लाखांच्या साठ्यावर कारवाई

खेळाडू आरक्षणाचे नवे धोरण; ५ टक्के आरक्षणासाठी क्रीडा ई-प्रमाण अनिवार्य

मुर्तीजापूरमध्ये कबड्डीचा थरार सुरू!५३व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्याचा माई सोशलचा संकल्प

अग्रसेन जयंती निमित्त मूर्तिजापुरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

रक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व… संजय एम.देशमुख कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!