Join WhatsApp group

Ads

-

किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली शेतकरी धडकले तहसीलवर, शेतकऱ्यांनी शासनाला आश्वासनाची पुन्हा आठवण करुन दिली

By Sarkarmzanews

May 30, 2025 6:35 pm

Ads

दिनांक ३० : संजय उमक, मुर्तीजापुर : मागेल त्यालाच कर्जमाफीसाठी शासनाला कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली ३० मे रोजी शुक्रवारी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडक दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकी दरम्यान मूर्तिजापूर येथील जाहिरात सभेत भाजपा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु आश्वासन पाळले नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडने शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला आहे.
न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरले आहेत, दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून तहसीलदार मूर्तिजापूर यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित अर्ज लाखल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आज शुक्रवार ३० मे रोजी बोंडे चेम्बर्स, कॅनरा बँक समोर अर्ज एकत्र येऊन तेथून जथ्थ्याने तहसील कार्यालय गाठले, तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना संबंधित अर्ज सादर केले आहेत.

हा लढा शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी एकहाती घेतला असून ते पुढील न्यायलयीन लढाईसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आहेत. हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले होते. कर्जमाफी करून वचन पूर्ती करा अन्यथा न्यायालयीन लढ्या सोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्न त्याग उपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्ज माफी अभियानात तहसील समोरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी दिला. कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्यामार्फत तहसीलदार यांना आपले अर्ज समूहाने सादर केलेत.

यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, अवि पोळकट, नंदकिशोर बबानीया, मुन्ना नाईकनवरे, डॉ. संजय उमाळे, छोटूभाऊ बोंडे, प्रशांत कडू, डॉ. देविदास बारकटे, मिलिंद ठाकरे, तुषार हागे, अनंत शेटे, बाळूभाऊ मते, सुधीर ठाकरे, जगदीश जोगळे, सुभाष कटिंग, प्रफुल्ल मालधूरे, राम ठोकळ, संजय डोंगरे, राजू ढोरे, प्रकाशसिंग राजपूत, विजय मुगल, विश्वनाथ सावळे, संजय खरबडकर, पुंडलिकराव मोरे, सुभाष मोरे, मनोहर ताकतोडे, अरुण बोंडे, गोपाळराव गुल्हाने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!