Join WhatsApp group

Ads

पळसोडा येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण

By Sarkarmzanews

January 26, 2026 2:44 pm

Ads

दिनांक: २६ : मा. तालुका कृषी अधिकारी श्री. दीपक तायडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन कृषी विभाग, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पिके) व ग्राम विकास मित्र मंडळ, पालसोडा यांच्या संयुक्त विद्यमाने पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिरात संशोधन सहयोगी कृषी महाविद्यालय, नागपूर येथील डॉ. आनंद वरघट साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. के. व्ही. वानखेडे तसेच उपकृषी अधिकारी श्री. अतुल राणे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, पिक फेरपालट व एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. संतोष राठोड यांनी केले. त्यांनी हवामान बदलाचा विचार करून सुधारित व शाश्वत पिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम विकास मित्र मंडळाचे श्री. सुनील वानखेडे व नवनिर्वाचित नगरसेवक श्री. भूपेंद्र मारुती आप्पा पिंपळे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला मंडळ व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा मिळाली असून आगामी हंगामात उत्पादन वाढीस मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!