Join WhatsApp group

Ads

---

“कार्टर-कोंबडीची मागणी करणाऱ्या सचिवाला शेतकरी संघटनेचा धक्का! व्यापारी-शेतकरी फुलझेले यांच्या तक्रारीवर पप्पू पाटील तिडके यांचे आंदोलन; अखेर सार्वजनिक माफी”

By Sarkar Maza

March 10, 2026 11:15 pm

Ads

मूर्तिजापूर – दिनांक १० : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे.भाडेकरू

असलेल्या व्यापारी तसेच शेतकरी प्रणव फुलझेले यांच्याकडून भाड्याव्यतिरिक्त कार्टर आणि कोंबडीची मागणी केल्याचा गंभीर आरोप समितीचे सचिव मडगे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडताच अखेर सचिवांना सार्वजनिक माफी मागावी लागली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर बायपास येथे प्रणव फुलझेले यांचे डेप व पशुपालन खाद्य केंद्र भाड्याने आहे. फुलझेले हे स्वतः शेतकरीही असून व्यापारी म्हणून व्यवसाय करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सचिव मडगे हे नियमित भाड्याव्यतिरिक्त वारंवार “कार्टर आणि कोंबडी” देण्याची मागणी करत होते. मागणी पूर्ण केली नाही तर “दुकान खाली करावे लागेल” असा दबावही टाकला जात असल्याचा आरोप फुलझेले यांनी केला.

सततच्या या त्रासाला कंटाळून अखेर फुलझेले यांनी शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच तिडके यांनी तात्काळ कार्यकर्त्यांना बोलावून कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर बायपास येथे जोरदार आंदोलन छेडले.

तिडके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच सचिव मडगे यांनी अखेर सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत, “अनावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो,” असे जाहीर केले.दरम्यान, बाजार समितीचे संचालक दिवाकर गावंडे यांनीही दिलगिरी व्यक्त करत दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.या

या प्रकरणावर बोलताना पप्पू पाटील तिडके यांनी ठाम इशारा देत म्हटले की, “कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी आहे.

जर कोणत्याही व्यापाऱ्यावर किंवा शेतकऱ्यावर दबाव टाकून अवैध मागण्या केल्या जात असतील तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाही.

गरज पडल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.”या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!