Join WhatsApp group

Ads

गटबाजी की गेम प्लॅन? हॉटेल ट्रायडेंटच्या गुप्त बैठका… मुर्तिजापूरच्या सत्तेचा पडद्यामागचा खेळ?”

By Sarkar Maza

August 7, 2026 8:41 am

Ads

“राजकारणात बातम्या कमी आणि संकेत जास्त असतात. संकेत वाचता आले, तर सत्तेचा पुढचा अध्याय आधीच दिसू लागतो…”

मुर्तिजापूर नगरपरिषदेचे राजकारण सध्या दोन भागांत विभागलेले दिसते. एक भाग जनतेला दिसतो… आणि दुसरा भाग बंद दाराआड घडत असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच विषय सातत्याने चर्चेत आहे—मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या कथित गुप्त बैठका.

या बैठका नेमक्या कशासाठी? कोणाच्या पुढाकाराने? त्यात कोण उपस्थित होते? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र राजकीय सूत्रांच्या चर्चेनुसार, या बैठकींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी विठ्ठलजी सरप यांचे नाव घेतले जात आहे.

पण खरी उत्सुकता बैठकींपेक्षा त्यांच्या ‘मौनात’ आहे.

Note – Results are different individual

online weight management program also avilable

Paid advertisement

जर या बैठका केवळ औपचारिक होत्या, तर त्यांची इतकी चर्चा का? आणि जर त्या निर्णायक होत्या, तर आतापर्यंत कोणताही निर्णय का जाहीर झाला नाही?

राजकारणात अनेकदा मौन हेच सर्वात मोठे विधान असते. विशेषतः जेव्हा स्थानिक नेते बोलणे टाळतात आणि कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज वाढते.

मुर्तिजापूरमध्येही आज नेमके तेच चित्र दिसत आहे.

काही नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काहींचे राजकीय पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. तर काही जण योग्य क्षणाची वाट पाहत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. मात्र या सर्व चर्चांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते—

बैठका कधीच बातमी नसतात… त्या बैठकीनंतर बदलणारे चेहरे गणित आणि बदलणारी निष्ठा हीच खरी बातमी असते.

म्हणूनच सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे…

मुर्तिजापूर मध्ये फक्त राजकीय चर्चा सुरू आहेत… की ‘ऑपरेशन नगराध्यक्ष’ची स्क्रिप्ट शांतपणे लिहिली जात आहे?

या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेही नाही.

मात्र इतके नक्की—

ट्रायडेंटमधील कथित बैठकींचा धूर दिसत आहे… आता त्या धुरामागे खरंच राजकीय आग आहे का, हे येणारे दिवस ठरवतील.

क्रमशः…

भाग २ मध्ये…

“नगराध्यक्षपदाचे डोहाळे नेमके कोणाला? इच्छुक, गटबाजी आणि सत्तेच्या खुर्चीभोवती फिरणारे राजकीय गणित!”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!