Join WhatsApp group

Ads

350 अश्लील व्हिडिओंचा स्फोट? 180 तरुणींच्या शोषणाचा दावा, खासदार अनिल बोंडे यांची SIT ची मागणी

By Sarkar Maza

April 14, 2026 1:24 am

Ads

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने तब्बल 180 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि सुमारे 350 अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

खासदार बोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपीने तरुणींना फसवून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले, त्यानंतर त्यांचे खासगी क्षणांचे व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले. या ब्लॅकमेलिंगमुळे अनेक तरुणींना त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार सहन करावे लागल्याचा आरोप त्यांनी केला.या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, बोंडे यांनी तात्काळ विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

तसेच, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही, तर आम्ही एसपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे परतवाडा आणि अमरावती परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रशासनाची कसोटी:

इतक्या मोठ्या प्रमाणावर शोषणाचे आरोप समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणात जलद आणि निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. तरुणींना सुरक्षितता देणे आणि सायबर गुन्ह्यांवर आळा घालणे ही यंत्रणेसमोरील मोठी जबाबदारी ठरत आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!