Join WhatsApp group

Ads

हायकोर्टाच्या आदेशाला न जुमानता डीजेचा अतिरेक; मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई चार Dj जप्त

By Sarkarmzanews

September 26, 2026 9:26 pm

Ads

चार डीजे पोलिस ठाण्यात जमा; आता जप्तीपुढे गुन्हा दाखल होणार का? कारवाईकडे तालुक्याचे लक्ष

मुर्तिजापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशासह जिल्हाधिकारी अकोला यांच्या डीजे व ध्वनिप्रदूषणासंदर्भातील आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करूनही मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये काही मंडळांकडून डीजे वाजविण्याचा अतिरेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी समज देऊनही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.

मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कालपासून आजपर्यंत कारवाई करत चार डीजे ताब्यात घेतले असून ते पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, डीजेचा वापर करण्यापूर्वी पोलिसांकडून संबंधितांना नियमांची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.

आता खरा प्रश्न आहे तो या चार डीजेंवर पुढे काय कारवाई होते? केवळ डीजे ताब्यात घेऊन प्रकरण संपणार की ध्वनीप्रदूषण, वाहनातील/साउंड सिस्टीममधील अनधिकृत मॉडिफिकेशन आणि लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल केले जाणार? तसेच न्यायालयीन आदेशाच्या उल्लंघनाच्या बाबतीत संबंधित कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ठाणेदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आता जप्त केलेल्या चार डीजेंबाबत पुढील कायदेशीर कारवाई काय होते, यावरच या कारवाईची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे.

डीजे जप्ती पर्यंत कारवाई थांबणार, की कायद्याच्या चौकटीत पुढची कठोर कारवाईही होणार?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!