Join WhatsApp group

Ads

--

अजित पवार यांच्या निधनामुळे एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साधेपणाने; सोहळे न करण्याचे आवाहन

By Sarkarmzanews

February 9, 2026 9:18 am

Ads

मुंबई, दि. ९ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या पार्श्वभूमीवर यंदा ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत, शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावू नयेत तसेच कोणतेही कार्यक्रम किंवा सोहळे आयोजित करू नयेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त करताना श्री. शिंदे म्हणाले की, “मी माझा सहकारी आणि जवळचा मित्र गमावला आहे. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून निघणारी नाही.

पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सर्व सहभागी आहोत.”सध्याच्या दुःखद वातावरणात वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे सांगत, परिस्थितीचे गांभीर्य जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे समारंभ, कार्यक्रम किंवा सार्वजनिक उत्सव आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!