Join WhatsApp group

बलेनो गाडीतून ड्रग्ज, गांजा व बनावट नोटांसह २० लाखांचा माल जप्त! पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (प्रतिनिधी): ०२ नोव्हेंबर २५ : वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरात शनिवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी पोलिसांनी एक मोठी कारवाई करत संत अमरदास नगर भागातून एक बलेनो कार (क्रमांक टीएन-०९ ईव्ही-६०२७) ताब्यात घेतली. या कारमध्ये एमडी ड्रग्ज, गांजा आणि ₹१.८९ लाख किंमतीच्या बनावट ₹५०० च्या नोटा असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिसोड-मालेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.

कारवाईनंतर वाशीम येथून पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मुद्देमालाची तपासणी सुरू होती. दरम्यान, कारचा काच फुटलेला असल्याने या प्रकरणामागे काही वेगळे घडले का, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

या प्रकरणात एकूण ₹२० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे —

  • बलेनो गाडी किंमत ₹१० लाख
  • बनावट ₹५०० च्या ३७८ नोटा ₹१.८९ लाख
  • एमडी ड्रग्ज व गांजा ₹८ लाख

या घटनेचे थेट कनेक्शन तेलंगणाशी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा सखोल तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत असून, शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!