Join WhatsApp group

Ads

-

न्यायाधीश व अधिकाऱ्यांच्या निवास परिसरातच खुलेआम मद्यपान; सामान्य नागरिकांचा सुद्धा वाढला त्रास

By Sarkar Maza

May 18, 2026 12:04 pm

Ads

मूर्तिजापूर शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून आता त्याचा फटका सामान्य नागरिकांसह सरकारी क्लास वन अधिकाऱ्यांनाही बसत असल्याचे चित्र स्टेशन परिसरात दिसून येत आहे. महाजन वाईन शॉपजवळ काही चायनीज चखना दुकाने तसेच पानटपरी चालकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी काही तळीराम अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरच मद्यप्राशन करत बसतात. अतिक्रमित दुकानांभोवती उशिरापर्यंत गोंधळ, आरडाओरडा आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक महिलांनी रात्री या मार्गाने जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय, वाईन शॉपवर मद्य खरेदीसाठी येणारे अनेक ग्राहक आपली फोर व्हीलर व टू व्हीलर वाहने थेट रस्त्यावरच उभी करून दुकानात जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.विशेष बाब म्हणजे ज्या परिसरात न्यायाधीश, सरकारी अधिकारी व इतर क्लास वन अधिकारी वास्तव्यास आहेत, त्याच भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे सिव्हिल लाइन मध्ये राहणाऱ्या क्लास वन अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा परिसरात आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उघडपणे मद्यपान करणाऱ्या तसेच टपऱ्यांवर बसून दारू पिणाऱ्या तळीरामांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

अन्यथा भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!