Join WhatsApp group

Ads

घरातील भांडण रस्त्यावर? नगरपरिषद निवडणुकीत भाजपची कसोटी

By Sarkarmzanews

December 20, 2025 1:16 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक २० : मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होत असून शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. अनेक उमेदवारांचे ठोके वाढले असून अनेकांची प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लागली आहे.

सत्ता, वर्चस्व आणि पुढील राजकीय समीकरणे या एका निकालावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.भाजपच्या अंतर्गत गटबाजीने या निवडणुकीला निर्णायक वळण दिले आहे.

पक्षविरोधात काम करत “पाठीत खंजीर खुपसणाऱ्या” नेत्यांवर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हकालपट्टीचे सूत्र राबवण्यात आले आहे.

आतापर्यंत चार नेत्यांवर कारवाई झाली असून, जर उद्या भाजपला फटका बसला तर हकालपट्टीची संख्या चारवरून थेट बारापर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.दरम्यान, उद्याच्या निकालांबाबत आणखी एक चर्चेचा मुद्दा पुढे येत आहे.

कूटनीती राजकारणी आमदार हरीश पिंपळे हे राजकारणातील ‘हनुमान’ ठरून विरोधकांची ‘लंका जाळणार’ का ? असा सवाल उपस्थित होत आहे. संपूर्ण मतपेट्या उघडल्यानंतरच हा राजकीय खेळ शहराला स्पष्टपणे समजणार असून, कोणाचा डाव यशस्वी ठरला आणि कोणाची रणनीती अपयशी ठरली, हे उद्याच उघड होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रामायणातील लंकेतल्या विभीषणची उपमा देखील चर्चेत असून, मुर्तिजापूर शहरात खरेच “विभीषण” किती प्रभावी ठरले, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. उद्याचा दिवस मुर्तिजापूरच्या राजकीय इतिहासात एक नवा अभ्यास जोडणारा ठरण्याची शक्यता आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये भाजप चे नगराध्य पदाचे उमेदवार उच्चशिक्षित तरुण हर्षल साबळे या युवा नेत्याच्या भवितव्या कडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

घरातील भांडण रस्त्यावर येते की राजकीय कौशल्य बाजी मारते, हे मतपेट्यांतूनच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान भाजपचा अंतर्गत गटबाजी मुळे शिवसेना (उबाठा) गट बाजी मारेल की वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरेल, हा प्रश्न सध्या जनतेच्या मनात आहे.

उद्याचे निकाल केवळ एकपक्षाची सत्ता ठरवणार नाहीत, तर मुर्तिजापूरच्या पुढील भाजप पक्षाचा राजकीय दिशेलाही आकार देणारा ठरणार.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!