Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर दिव्यांगांची परवड – स्वच्छतागृह असूनही बंदच

By Sarkar Maza

April 22, 2026 6:46 am

Ads

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत भारत योजने अंतर्गत मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा विकास मोठ्या गाजावाजात करण्यात आला. मात्र, या विकासकामांचा खरा चेहरा आता उघड होत आहे.

प्लॅटफॉर्मवर दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाल्यानंतरही आजतागायत बंदच असल्याचे वास्तव समोर आले असून, यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी खास तयार करण्यात आलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र निष्प्रभ ठरली आहे.

लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले स्वच्छतागृह वापरासाठी खुलेच नसल्याने हा संपूर्ण उपक्रम केवळ दिखावा ठरत असल्याची टीका होत आहे.

स्थानकावर ये-जा करणाऱ्या दिव्यांग व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मुळे सगळ्यात जास्त मोठा त्रास दिव्यांग महिलांना होत आहे.

“सुविधा आहे, पण वापरायला नाही; मग असा विकास कशासाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाने केवळ उद्घाटनापुरते काम करून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे पाठ फिरवल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दिव्यांगांच्या हक्कांवरच गदा आणण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी दिव्यांग प्रवासी करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!