Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूरात आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली विकासाचा रोडमॅप तयार

By Sarkar Maza

April 17, 2026 8:51 pm

Ads

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी आयोजित ‘वार्षिक आमसभा व सरपंच-उपसरपंच शिबिर २०२५-२६’ नुकतेच ग्राम शेलु वेताळ (ता. मूर्तिजापूर) येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात अध्यक्षस्थानी राहून तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित होते.

त्यामुळे सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली, तसेच अनेक मुद्द्यांवर तत्काळ चर्चा होऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.सभेत रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि शेतीविषयक अडचणींवर सखोल चर्चा झाली.

शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला.

आरोग्य क्षेत्रात ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.याशिवाय, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि उपजीविकेची साधने वाढवणे यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

ग्रामविकासाच्या दृष्टीने स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासकामे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शासन आणि जनतेतील दरी कमी करून विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या शिबिरास उपविभागीय अधिकारी श्री. संदीपकुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे, गटविकास अधिकारी श्री. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कराडे, गटशिक्षण अधिकारी श्रीमती रामटेके, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. नंदकिशोर राऊत, माजी तालुकाध्यक्ष श्री. भूषणभाऊ कोकाटे यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!