Join WhatsApp group

गौरक्षकाच्या सतर्कतेने अवैधरीत्या कोबुन नेणाऱ्या म्हशींना जीवनदान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर – मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय राज्य महामार्गावर आज सकाळी थरारक असा घटनाक्रम नागरिकांना पाहायला मिळाला आहे.

अमरावती येथून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला आज पकडण्यात आले आहे अमरावती नांदगाव येथून निघालेला ट्रक एम.पी 20 झेड.के 3507 या वाहनातून अवैध वाहतूक होत असल्याची शंका अमरावती येथील गौरक्षकांना आली असता

अमरावती येथील गौरक्षकांनी या वाहनाचा पाठलाग करत राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर नजीक या वाहनाला पकडले आहे सध्या राष्ट्रीय महामार्गावरून रोज अवैध गो वाहतूक होत असल्याची घटना घडत आहे अमरावती येथील गौरक्षकांच्या सतरतेमुळे हा ट्रक पकडण्यात आला आहे अमरावती येथून निघालेला हा ट्रक अवैध रित्या मैहशी यांचे पाय बांधून त्यांना कोंबून अत्यंत निर्दयपणे ही वाहतूक होत होती

अमरावती येथील गौरक्षकांनाही बाब लक्षात येताच यांनी हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकचालकाने गौरक्षकांच्या अंगावरच ट्रक नेण्याचा प्रयत्न केला ट्रकचा पाठलाग करत असताना ट्रकचा समोरील टायर फुटला तरी सुद्धा ट्रक चालक हा अमरावती वरून मुर्तीजापुर पर्यंत विना टायरचा ट्रक घेऊन आला अमरावती येथील गौरक्षकांनी या घटनेची माहिती बोरगाव मंजू ,कुरणखेड ,येथील गौरक्षकांना दिली असता

येथील गौरक्षकांच्या मदतीने मुर्तीजापुर बायपास वर हा ट्रक पकडून मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्यात आला आहे यामुळे लाखो रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे यावेळी मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनची ठाणेदार जाधव पुढील कारवाई करत आहे.

*जीवाची परवा न करता गौरक्षक निभवतात आपलं कर्तव्य*

सध्या आपल्या महामार्गावर रोज अवैधरीत्या निर्दयीपणे जनावरांची वाहतूक होत आहे गौरक्षकांच्या हे लक्षात येताच गौरक्षकांच्या मदतीने अनेक वाहनांना पकडण्यात आले असून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे यावेळी अनेक गौरक्षक वाहतूक करणारे ट्रक चालक हे गौरक्षकांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आपल्या जीवाची परवा न करता गौरक्षक हे अनेक मोठ्या प्राण्यांना वाचून त्यांना गौशाळेमध्ये घेऊन जात असतात

गौरक्षकांनी आपल्या जीवाची परवा न करता जवळपास 60 च्या वर म्हशींना जीवनदान दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे, भाजपाचे कमलाकर गावंडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे यांनी पोलीस स्टेशनला भेट देत वाहनावर कारवाई करण्यात यावी आणि ही वाहतूक थांबवण्यात यावी अशी चेतावणी पोलिसांना दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!