Join WhatsApp group

Ads

-

गाय चोरीचे जाळे सक्रिय? मुर्तीजापुरातील गायी बोरगावात कापल्या जात असल्याचा आरोप

By Sarkar Maza

March 8, 2026 11:38 am

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ०८ : शहरातून मोठ्या प्रमाणात गायी चोरी करून त्यांची बोरगाव येथे कत्तल करून गौमांस विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. रात्रीच्या वेळी शहरातील मोकाट फिरणाऱ्या गायींवर लक्ष ठेवून चोरटे त्या पळवून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मागील सुमारे एक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात असून या संदर्भात मुर्तीजापुर येथून बदली होऊन बोरगाव येथे गेलेल्या एका रायटरला याची सर्व माहिती असल्याची चर्चा देखील शहरात रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुर्तीजापुर शहरात अनेक ठिकाणी गायींचे संगोपन केले जाते. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक नागरिक आपल्या दारी गाय येण्याची वाट पाहतात आणि तिचे पूजन करतात. याच कारणामुळे अनेकांनी आपल्या गायी शहरात मोकाट सोडलेल्या असतात. मात्र या परिस्थितीचा फायदा घेत चोरटे रात्रीच्या वेळी गायी चोरी करून नेत असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या गायी बोरगाव येथे नेऊन त्यांची कत्तल करून गौमांस विक्री केल्याची चर्चा असून काही ठिकाणी अकोला परिसरातही त्याचा पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याने आतापर्यंत या संदर्भात किती कारवाई केली, याबाबतही नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. गायींची चोरी होऊन नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई कोण देणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने लक्ष देऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करून सत्य समोर आणावे, अशी जोरदार मागणी मुर्तीजापुरातील नागरिकांकडून केली जात आहे.

news photo – ai gentated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!