Join WhatsApp group

Ads

-

मशिदीबाहेरच घात! काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा चाकूहल्ल्यात अखेर मृत्यू

By Sarkarmzanews

January 7, 2026 8:59 am

Ads

अकोट: दिनांक ०७: अकोट तालुक्यातील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत उल्ला खा बरकत उल्ला खा पटेल (वय ६७) हे मंगळवारी मोहाळा येथील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना दुपारी सुमारे दीडच्या सुमारास उबेद उर्फ उमेद कालू पटेल (वय २५) याने अचानक त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.

मान व पोटावर गंभीर जखमा झाल्याने पटेल रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना तत्काळ अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, २४ मे २०१९ रोजी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे.

आजचा आरोपी उबेद पटेल हा मतीन पटेल यांचा पुतण्या असून काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याची प्राथमिक चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वी उबेद पटेल याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही पुढे आली आहे.हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच पणज परिसरातून आरोपीला अटक केली.

घटनेनंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!