Join WhatsApp group

Ads

--

सिंचन प्रकल्पाचा काम पूर्ण करा – आमदार हरीश पिंपळे

By Sarkarmzanews

January 10, 2025 6:55 pm

Ads

मूर्तिजापूर : तालुक्यातील मुख्यत्वे उमा बॅरेज प्रकल्पासह सिंचनाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश गुरुवारी विशेष प्रकल्प जलसंपदा कार्यालय अमरावती येथे घेतलेल्या बैठकीत आ. हरीश पिंपळे यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आमदारांच्या निर्देशामुळे शेतकऱ्यांनां दिलासा मिळाला आहे.

आ. हरीश पिंपळे यांनी गुरुवार, ९ जानेवारीला विशेष प्रकल्प जलसंपदा कार्यालय, अमरावती येथे मुख्य अभियंता टाले, अधीक्षक अभियंता दाभाडे व कार्यकारी अभियता सानप यांच्यासोबत आढावा बैठक झाली. या बैठकीत मतदार संघातील उमा बॅरेजप्रकल्पाची ७०७ कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळूनही प्रकल्पाची रखडलेली मुख्य कामे तातडीने पूर्ण करण्यासह शिल्लक कानांची निविदा कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी व कवठा शेलू ल. प. प्रकल्पास नियामक मंडळाची मान्यता मिळाली असल्याने तांत्रिक कार्यवाही तातडीने पूर्ण करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकयांच्या प्रश्नाबाबत आमदार आदी पासूनच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. हे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकयांना सिंचनाची सुविधा निर्माण होऊन त्याचे जीवनमान पण उंचावेल, असा आशावाद आ. हरीश पिवळे यांनी व्यक्त केल आहे. या मुळे शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!