Join WhatsApp group

Ads

सिटी ताइक्वांडो अकॅडमीचे खेळाडू चमकले; पुसदमध्ये 7 पदकांची कमाई – दिनेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूरचा ताइक्वांडो संघ अव्वल

By Sarkar Maza

March 6, 2026 3:24 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक 06 : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे साईं ताइक्वांडो अकॅडमीच्या वतीने आयोजित 4th इंटर क्लास ताइक्वांडो चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत मूर्तिजापूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत मूर्तिजापूर येथील न्यू सिटी ताइक्वांडो अकॅडमीचे सात खेळाडू सहभागी झाले होते.
प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चार सुवर्ण (Gold) व तीन कांस्य (Bronze) पदके पटकावली.
सुवर्ण पदक विजेते :
🥇 गौरिक धंधुकिया
🥇 हर्ष खाडे
🥇 हार्दिक प्रधान
🥇 लक्ष देशपांडे
कांस्य पदक विजेते :
🥉 वैदेही इंगळे
🥉 गरिमा बांगड
🥉 पार्थ मानकर
या यशामुळे मूर्तिजापूर शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांना दिले आहे.

मूर्तिजापूरच्या या युवा खेळाडूंनी जिल्हास्तरावरील स्पर्धेत केलेली कामगिरी भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवून देईल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!