Join WhatsApp group

Ads

---

कचर्‍याच्या ढिगाऱ्यांनी वेढले बालमैदान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा स्फोटक प्रश्न: स्वच्छतेच्या गप्पा वेगळ्या, वास्तव वेगळे

By Sarkar Maza

March 1, 2026 11:51 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०१ :मुर्तिजापूर शहरातील सिंधी कॅम्प परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या खेळाच्या साहित्याजवळच कचऱ्याचे ढिगारे पडले असून त्यामुळे बालकांना खेळण्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

परिसरात प्लास्टिक, घरगुती कचरा, अन्नाचे अवशेष आणि इतर घनकचरा उघड्यावर टाकला जात आहे. कचऱ्यात जनावरे अन्न शोधताना दिसत असून त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डास, माश्या आणि दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे.

विशेष म्हणजे, या जागेच्या आजूबाजूला निवासी घरे देखील आहेत. कचऱ्यामुळे घरांमध्ये दुर्गंधी पसरत असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग तसेच श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच, कचऱ्यातील तुटलेल्या काचा व धारदार वस्तूंमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते; मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.

नियमित कचरा उचल व्यवस्था सुरू करावी, परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

सिंधी कॅम्प परिसरातील ही समस्या तातडीने सोडवून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!