Join WhatsApp group

Ads

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर १ ऑगस्टला; महसूल विषयक प्रलंबित कामांना मिळणार गती

By Sarkar Maza

July 15, 2026 5:43 pm

Ads

मूर्तिजापूर, दि. १५ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद, मूर्तिजापूर येथील हॉल क्रमांक २ व ३ मध्ये होणार आहे.

उपविभागीय अधिकारी संदीकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली.

त्यामध्ये शिबिराचा लाभ मूर्तिजापूर व बार्शिटाकळी तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थींना मिळणार आहे.

शासनाच्या विविध महसूल व कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.

शिबिरात मिळणारे प्रमुख लाभमहिलांना शेतकरी दर्जा देण्यासाठी प्रमाणपत्रांचे वितरण.

गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप.

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेबाबत कार्यवाही.

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया.

तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा.

‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.

सिंधी विस्थापितांच्या निवासी व व्यावसायिक जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी विशेष अभय योजनेचा लाभ.

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष तरतुदी.

कुंभार समाजातील पारंपरिक व्यवसायासाठी विविध सवलती.

शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यासंदर्भातील कार्यवाही.

याशिवाय, विविध शासकीय विभागांच्या इतर योजनांचाही लाभ नागरिकांना शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महसूल प्रशासनाने मूर्तिजापूर व बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून महसूल विषयक प्रलंबित कामे मार्गी लावून घ्यावीत, असे आवाहन केले आहे.

हे शिबिर नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवांचा लाभ मिळवून देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

Related Article

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर १ ऑगस्टला; महसूल विषयक प्रलंबित कामांना मिळणार गती

₹६ हजारांची लाच घेताना पंचायत समिती तेल्हाराचे सहायक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव

शिवणी विमानतळासमोरील अर्धवट उड्डाणपुला विरोधात नागरिकांचा इशारा; ३० जुलैला रास्ता रोको आंदोलन

बोगस बियाणे, खत कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा; आमदार हरिष पिंपळे आक्रमक नियम धाब्यावर ठेवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी;

मुर्तिजापूरात बंदी असलेली स्वीट सुपारी खुलेआम विक्रीला?; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन कारवाई करणार का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!