Join WhatsApp group

Ads

--

नगर परिषद निवडणूक नगरसेवकांचा विजय रॅलीचा जल्लोष नागरिकांसाठी डोकेदुखी

By Sarkarmzanews

December 24, 2025 10:02 am

Ads

गुलालामुळे शहरात अस्वच्छता, आरोग्य धोक्यात

मुर्तिजापूर : दिनांक २४ : मुर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या प्रत्येक नगरसेवकांनी विजय रॅली काढत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. मात्र हा जल्लोष आता सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

शहरातील जवळपास प्रत्येक गल्ली, चौक आणि मुख्य रस्त्यावर गुलालाचे ढीग साचलेले दिसत आहेत. वाहतुकीदरम्यान गुलालाची धूळ हवेत उडत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेवर खाज, अ‍ॅलर्जी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

⚠️ गुलालामुळे होणारे संभाव्य आरोग्य धोके

आरोग्य तज्ज्ञांच्या मते बाजारात मिळणाऱ्या रंगीत गुलालामध्ये अनेकदा केमिकल्स, कृत्रिम रंग आणि धातूंचे अंश असतात.

यामुळे—त्वचेवर फंगल व बॅक्टेरियल इन्फेक्शन .डोळ्यांना कंजक्टिव्हायटिस

.लहान मुलांमध्ये व वृद्धांमध्ये श्वसनाचे विकार

.दमा व अ‍ॅलर्जीच्या रुग्णांना गंभीर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जबाबदारी कोणाची?

नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त होत असून,“विजयाचा जल्लोष केला, पण शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नवनिर्वाचित नगरसेवक घेणार का?”असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

नगर परिषद प्रशासन आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी तात्काळ रस्त्यावरील गुलाल साफ करून स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!