Join WhatsApp group

Ads

राज्यस्तरीय कुमार कुस्ती स्पर्धेत मोहन तोरकड याला कास्यपदक

By Sarkarmzanews

December 6, 2024 1:56 pm

Ads

न्यूज डेस्क : अमरावती, दिनांक ६ :

दिनांक ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ संभाजीनगर हरसुल येथे १७ वर्षाखालील कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये अमरावती शहर जिल्हा चा संघाने सहभाग घेतला होता त्यात ग्रिको रोमन प्रकारात 48 किलो वजन गटात मोहन तोरकड यांने सहभाग घेतला होता.

मोहन हा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आदिवासी आश्रम शाळेच्या वर्ग बारावीचा विद्यार्थी असून त्याने कोल्हापूर च्या पैलवानांना हरवून कास्यपदक प्राप्त केले मोहन तोरकड हा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कुस्ती विभागात डॉ संजय तिरथकर जितेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो व तो श्री रामकृष्ण आदिवासी आश्रम शाळेचा विद्यार्थी आहे त्याच्या या प्रगती बद्दल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर रावजी वैद्य,डॉ माधुरीताई चेंडके, डॉ श्रीकांत चेंडके, ॲड.प्रशांत देशपांडे, प्रा.रवींद्र खांडेकर, डॉ संजय तिरथकर डॉ लक्ष्मीकांत खंडागळे डॉ मधुकर बुरनासे डॉ योगेश निर्मळ केनेडी सर सूरज बगळे विठ्ठल टोले सर यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!