Join WhatsApp group

काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीच्या स्वप्नात भाजप आणि विजय अग्रवाल येत आहेत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

समाजसेवे साठी सदैव कटिबद्ध: पूर्व महापौर

दिनांक २२ – अकोला – २४ तास भाजपा व विजय अग्रवाल हे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी च्या स्वप्नात दिसत असते त्यामुळे काही झाले तर भाजपा व अग्रवाल जबाबदार असल्याचा आरोप करण्याची परंपरा विरोधकांनी सुरू केली आहे. आपल्यासाठी जय पराजय हे काही नवीन नाही पराजय पासून आपण नवीन शिकून झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या दिल्याने समाजसेवा आणि समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारा भाजपाचा व सर्वसामान्यांचा सैनिक असल्याचा प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले.


जुने शहर एम एस सी बी प्रत्येक बाबतीमध्ये भाजपा व आपल्याला जबाबदार धरण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे हा मनोरंजन आपल्यासाठी असल्यासही त्यांनी सांगून पश्चिम अकोला तील जनता ही भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी सातत्याने स्वर्गीय लोकनेते भाऊसाहेब फुंडकर, गोवर्धन शर्मा, वसंतराव देशमुख, प्रमिलाताई टोपले, मदनलाल खंडेलवाल स्वर्गीय शंकरराव समुद्र, स्वर्गीय एडवोकेट पुराड उपाध्याय, दादा देशपांडे, मांगीलालजी शर्मा, गणेशराव ढगे, इब्राहिम चव्हाण, बळीराम चापले, बाल स्वामी मडपू, सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या जनसंघ पासून भाजपा पर्यंत प्रेम करणारा मतदारसंघ असून त्यामुळे हा पक्ष कार्यकर्त्यांचा व सर्वसामान्यांचा पक्ष असून वीज वितरण कंपनीच्या अडचणी, तांत्रिक बाब तसेच वारंवार होणारा जुना शहरातील नागरिकांना त्रास याबद्दल भाजपा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी प्रश्न उपस्थित केला आणि स्वतः जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले त्यानंतर जागृत होण्याचे नाटक करणारे पश्चिमचे लोकप्रतिनिधी अराजकता निर्माण करण्यासारखे वक्तव्य करून भाजपावर आरोप करण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु यामुळे सहानुभूती मिळत नाही कर्तव्य शुन्य व केवळ गप्पांचा बाजार करण्याने होत नसते यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागते आणि पाठपुरावा करावा लागतो ते सातत्याने भाजपा लोकप्रतिनिधी करत असतात परंतु आपण निवडून आलो म्हणून आपल्याला जास्त ज्ञान आहे आपण या शहराचे मालक आहोत अशा पद्धतीने सर्व विभागांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो लोकशाहीला घातक असून यापासून प्रशासनाने दखल घ्यावी व अकोल्याच्या विकासामध्ये अधिकारी राहणार नाही असा प्रयत्न काँग्रेस कडून होत आहे का असा सवाल विजय अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे आपण जय पराजय याला न घाबरणारे व पराजय झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागणारे भाजपाचे व अकोल्याकरांचे सेवेकरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!