Join WhatsApp group

Ads

-

अकोला जिल्हा शिक्षक बदली महाघोटाळा प्रकरणी मोठी अपडेट : आता संबंधित अधिकार्यान वर कारवाई अटळ?

By Sarkar Maza

March 24, 2026 3:50 pm

Ads

अकोला : २४ मार्च २६ :

अकोला जिल्ह्यातील शिक्षक बदली महाघोटाळा प्रकरण पुन्हा एकदा जोरात चर्चेत आले असून, या प्रकरणात आता मोठी प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे. १७ जुलै २०२५ रोजी कुरई यांनी पुराव्यानिशी सादर केलेल्या सविस्तर तक्रारीत तब्बल २६८ शिक्षकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बदली मिळवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या तक्रारीसोबत विविध कागदपत्रे, अर्ज, पडताळणीतील विसंगती आणि नियमबाह्य प्रक्रिया यांचे तपशील देण्यात आले होते.


मात्र, एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही संपूर्ण आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न घेता फाईल्स ‘हलत’च राहिल्या, अशी टीका होत आहे. त्यामुळेच आता प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे का? दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना? असे सवाल उपस्थित होत आहेत.


या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांना काही घरचाच लोकांनी आहेर केला असून प्रकरण दाबण्यात यावा या साठी प्रयन्त सुरु होते तरी शासकीय व प्रशासकीय कामा मध्ये पारदर्शकता टिकून राहावी या साठी कोणाचा दबावाला बळी न पडता सातत्याने पाठपुरावा करत आवाज उठवला. त्यांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि सरकारदरबारी पाठपुरावा करत या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारला दखल घ्यावी लागली.


दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य समजून आज या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या आदेशामुळे आता अनेक दिवसांपासून ‘थंडबस्त्यात’ गेलेल्या या प्रकरणाला गती आली आहे.


या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर २६८ बदल्या खरोखरच बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्या असतील, तर हा केवळ गैरव्यवहार नसून व्यवस्थेतील मोठ्या भ्रष्ट साखळीचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दाबून टाकले जाणार? हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. दरम्यान, जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, “न्याय झाला पाहिजे” अशी एकमुखी मागणी होत आहे.


येत्या काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळा राज्यभर गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!