Join WhatsApp group

Ads

फ्लाईंग किसने ‘लव्ह’ दाखवण्याचा प्रयत्न; तरुणीची तक्रार, युवकावर गुन्हा

By Sarkar Maza

March 11, 2026 1:03 pm

Ads

मुर्तिजापूर | मुर्तिजापूर शहरात एका तरुणीचा मागील दोन महिन्यांपासून पाठलाग करून त्रास देणाऱ्या युवकाविरुद्ध अखेर मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार बाजार परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कारंजा रोडवरील आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून दररोज घरून ये-जा करते. मागील सुमारे दोन महिन्यांपासून किरण सुरेश कन्हेकर (वय 25, रा. दहातोंडा ता. मुर्तिजापूर जि. अकोला) हा युवक तिचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दि. 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.50 वाजता तक्रारदार तरुणी आपल्या पतीसोबत मंगळवार बाजारातील सियाराम टॉय शॉपसमोरील रस्त्यावरून घरी जात असताना आरोपी पुन्हा तिच्या मागे आला. यावेळी त्याने तरुणीकडे पाहून फ्लाईंग किस करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तसेच फोन करण्याचा इशारा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हा प्रकार लक्षात येताच तरुणीने आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर तिच्या पतीने आरोपीला “माझ्या पत्नीचा पाठलाग का करतो?” अशी विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप नं. 320/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 74, 78, 79, 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफानौद्दीन करत असून गुन्हा हेडकॉन्स्टेबल शैलेश मेश्राम यांनी नोंदविला आहे.

न्यूज फोटो – Ai Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!