Join WhatsApp group

Ads

महान परिसरात तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला.

By Sarkarmzanews

December 19, 2024 9:07 am

Ads

बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी (ओम दाते) : दिनांक १९ : बार्शीटाकळी तालुक्यातील महान परिसरात रब्बी पिकांचे क्षेत्र असून रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे मात्र मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात हल्ला सुरू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे सध्या स्थितीत तुर पिक वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहे खरीप पिकांचे अति पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही तुर पिक फुलोरा व काही ठिकाणी शेंगा लागलेल्या अवस्थेत आहे.

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सध्या तूर पिकावर अळ्यांचा व विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता महान परिसरातील शेतकऱ्याकडून व्यक्त केली जाते आहे सोयाबीन पिकानंतर तूर हे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे सध्या स्थिती तुरीला बाजारात चांगला दर आहे उत्पादन चांगले झाल्यास या पिकातून बऱ्यापैकी आधार मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तूर पिकावर आशा आहे तसेच रब्बी हंगामही चांगल्या प्रकारे साथ देईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत मात्र परिसरात ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे महान परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशी माहिती आमचे तालुका प्रतिनिधी ओम दाते यांना महान परिसरातील शेतकरी यांनी दिली आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!