दिनांक ३० : अकोला : मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक साहेब यांनी अकोला शहरातील अवैधधंद्यावर अंकुश लावण्यासाठी ” ऑपरेशन प्रहार” ची घोषणा केलेली असून त्या अनुषंगाने आज दिनांक २९/०१/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील दोन पथकाने अकोला शहरातील पो. स्टे सिव्हील लाईल अकोला चे परिसरातील कृषी नगर येथे अवैधरित्या घरगूती गॅस सिलेंडर मधून अटोमध्ये गॅस भरणा-या ठिकाणी रेड करण्याती आली त्या ठिकाणी ईसम नामे १) राजकुमार महेंद्र सिरसाठ वय ३३ वर्ष रा.न्यु भीम नगर कृषी नगर अकोला २) सुनिल शंकर गायकवाड वय ४० वर्ष रा. शिवाजी चौक शिवसेना वसाहत, जुने शहर अकोला याना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे पासून घरगुती गॅस सिलेंडर ०३, गॅस भरण्याकरीता उपयोगी मशीन, ०१ अॅटो व ईतर साहीत्य एकुण २,३८,०००/-रूपार्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द कलम ३,७ भारतीय जिवनावश्यक वस्तु अधिनीयम सह कलम २८७ भा. न्या. सं प्रमाणे कार्यवाही करीता त्यांना पो. स्टे सिव्हील लाईन अकोला ये ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच पथकाने पो. स्टे सिटी कोतवाली हद्दील काला चाबूतरा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर छापा कार्यवाही केली असता त्या ठिकाणी नामे ३) मोहम्मद फारूख मोहम्मद इकबाल वय ४४ वर्ष रा. दिपक बौक अकोला ४) मोहम्मद रफिक मोहम्मंद कासम वय ५४ वर्ष रा.१२ नंबर गल्ली हमजा प्लॉट हरीहर पेठ अकोला यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे पासुन बगदी, मोटार सायकल, मोबाईल, व जुगार उपयोगी साहीत्य असा एकुण ९८,७६०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद होणे कामी त्यांना पो. स्टे सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे तसेच पथकाने पो. स्टे जुने शहर हद्दील शिवाजी टाऊन शाळेच्या परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर छापा कार्यवाही केली असता त्या ठिकाणी नामे ५) अतुल गोकुळ चांदुरकर वय ३२ वर्ष रा. पार्वती नगर बाळापूर नाका अकोला ६) संदेश भिमराव शेगावकर वय ४१ वर्ष रा. हरीहर पेठ अकोला (७) अभिलाश विक्रमसिंग ठाकुर वय ३० वर्ष रा. पार्वती नगर बाळापूर नाका अकोला यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे पासुन नगदी, मोबाईल, व जुगार उपयोगी साहीत्य असा एकुण ४५,२००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद होणे कामी त्यांना पो. स्टे जुने शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. अर्पित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि. श्री. शंकर शेलके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात पोउपनि माजीद पठान स्वागुता. पो. अमंलदार फिरोज खान, उमेश पराय, अब्दुल माजिद, रवी खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोदींन शेख, अविनाश पाचपोर, एजाज अहमद, अशोक सोनोने, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर, चालक अक्षय बोबडे यांनी केली आहे.
