Join WhatsApp group

Ads

---

पिंपळशेंडा लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीला ६.६० कोटींची मंजुरी; २५५ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ आमदार हरीश पिंपळे यांच्या पाठपुरवठ्याला यश

By Sarkarmzanews

February 10, 2026 9:27 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १० : मुर्तीजापुर तालुक्यातील पिंपळशेंडा येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची दुरुस्ती व्हावी. ही या भागातील शेतकरी बांधवांची जुनी मागणी होती या मागणीचा सातत्याने पाठपुरवठा केल्यानंतर आमदार हरीश पिंपळे यांना यश मिळाले असून मुर्तिजापूर तालुक्यातील मौजे पिंपळशेंडा येथील लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या दुरुस्ती कामासाठी सुमारे ६ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.पिंपळशेंडा लघुपाटबंधारे योजना जलसंपदा विभागामार्फत सन १९८१ मध्ये पूर्ण करण्यात आली होती. या योजनेची संकल्पित सिंचन क्षमता ४९१ हेक्टर असून धरणाची पाणीसाठा क्षमता सुमारे २६२० घनमीटर आहे. सन २०२१-२२ मध्ये ही योजना जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती.दीर्घकाळ वापर, नैसर्गिक गाळसंचय आणि संरचनेतील झीज यामुळे योजनेची कार्यक्षमता कमी झाली होती. त्यामुळे दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली होती. मंजूर दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे ४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पुन्हा कार्यक्षम स्वरूपात उपलब्ध होणार आहे.या योजनेच्या दुरुस्तीमुळे परिसरातील सुमारे २५५ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार असून, शेतकऱ्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होऊन शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळशेंडा लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाल्याने मुर्तिजापूर तालुक्यातील शेतीसाठी जलसुरक्षेला मोठी बळकटी मिळणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!