Join WhatsApp group

Ads

“अकोला शिक्षक बदली महाघोटाळा – अधिकारी वर्गावर चौकशीची टांगती तलवार” CEO ते BEO व BDO सगळ्यांची होणार बदली कि निलंबन?

By Sarkar Maza

March 25, 2026 8:09 am

Ads

अकोला, प्रतिनिधी :
अकोला जिल्ह्यातील २६८ शिक्षकांच्या संशयास्पद बदली प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात जिल्हा तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांवर संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत. १७ जुलै २०२५ रोजी कुरई यांनी पुराव्यानिशी सादर केलेल्या तक्रारीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बदली झाल्याचा दावा करण्यात आला होता.

तक्रारीसोबत विविध कागदपत्रे, अर्ज, पडताळणीतील विसंगती आणि नियमबाह्य प्रक्रिया यांचे तपशील देण्यात आले होते. मात्र, तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने या प्रकरणात वेळकाढूपणाचा आरोप होत आहे.

तक्रारीनुसार, जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अकोला, श्री. लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच श्री. रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेता फाईल्स प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, तालुका स्तरावरही गटशिक्षणाधिकारी (BEO) आणि गटविकास अधिकारी (BDO) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर व बार्शिटाकळी या तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी — श्याम राऊत, वर्षा कल्याणकर, गौतम बडवे, दिनेश दुतंडे, संजय पोरे, वैशाली रामटेके, मधुकर सूर्यवंशी, सुनिता बकाल, शोभा महेर, प्रविण डाबेराव, संदीप पालवे आणि केशव पागृत — यांच्या कार्यकाळातील बदली प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

तसेच, गटविकास अधिकारी (BDO) म्हणून अकोला येथील जयश्री वाघमारे व प्रेमा पटोकार, अकोट येथील माया वानखडे व रमाकांत माळी, तसेच तेल्हारा येथील सुभाष काळे व अशोक बांगर यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या मते, BEO आणि BDO यांनी संगनमताने नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया राबवून अपात्र शिक्षकांना बदली मिळवून दिली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

आता या चौकशीअंती CEO ते BEO व BDO सगळ्यांची बदली होणार कि निलंबन? की प्रकरण पुन्हा दडपले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!