Join WhatsApp group

Ads

-

अकोला पंचायत समिती भ्रष्टाचाराचा अड्डा? ACB कारवाईत महिला अभियंता रंगेहाथ

By Sarkar Maza

May 1, 2026 8:08 am

Ads

अकोला– दि. ३० एप्रिल २०२६ रोजी अकोला पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आल्याने “भ्रष्टाचाराचा अड्डा” बनल्याचे चित्र समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज कारवाई करत बांधकाम विभागातील महिला कनिष्ठ अभियंता जया पांडुरंग इंगोले (वय ४९) यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सन २०२४ मध्ये तयार केलेल्या ११० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे प्रलंबित बिल काढून देण्यासाठी इंगोले यांनी ३०,००० रुपयांची लाच मागितली होती. २७ एप्रिल रोजी तक्रार ACB कडे दाखल झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली असता लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर ३० एप्रिल रोजी पंचायत समिती, अकोला येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ३०,००० रुपये स्वीकारताच ACB पथकाने इंगोले यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक समिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

नागरिकांना आवाहन:

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला येथे संपर्क साधावा.

📞 ०७२४-२४१५३७० |

📱 ९४०३८०१०६४

photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!