Join WhatsApp group

Ads

अकोला एलसीबीचे ‘सुपर कॉप’ शंकरराव शेळके यांची बढती; उत्तराधिकारी कोण?

By Sarkar Maza

June 4, 2026 1:02 pm

Ads

अकोला जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) प्रमुख पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांची पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शंकरराव शेळके यांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सांभाळताना जिल्ह्यातील अनेक गंभीर व गाजलेल्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून आरोपींना गजाआड केले. चोरी, दरोडे, घरफोड्या, हत्याकांड तसेच इतर क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत एलसीबीची कार्यक्षमता सिद्ध केली.

त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अनेक प्रकरणांचा अल्पावधीत छडा लावून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता. त्यांच्या कार्यकाळात एलसीबीने अनेक यशस्वी कारवाया करत जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावली.

दरम्यान, शेळके यांच्या पदोन्नतीनंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखाचे पद रिक्त झाले आहे. जिल्ह्यातील वाढती आव्हाने, गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि एलसीबीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे पोलीस प्रशासनासह राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या पदासाठी अनेक सक्षम अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असल्याची माहिती असून, पोलीस अधीक्षक कोणावर विश्वास दाखवतात याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत नव्या एलसीबी प्रमुखाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!