Join WhatsApp group

Ads

जिल्हाधिकारी मा. श्री.अजित कुंभार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय युवा महोत्सवचे उदघाट्न

By Sarkarmzanews

December 5, 2024 8:25 am

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला दिनांक ०५ : युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी युवा महोत्सव मध्ये युवकांचा सहभाग आवश्यक “(मा. जिल्हाधिकारी मा. अजित कुंभार )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रीडा परिषद अकोला, व नेहरू युवा केंद्र अकोला यांचा संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे दि. 4/12/2024 रोजी करण्यात आले.
या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाट्न जिल्हाधिकारी मा. श्री. अजित कुंभार सर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री रामेश्वर भिसे, हे होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश्चंद्र भट्ट यांनी केले. तसेच सूत्रसंचालन यांनी केले. जिल्हास्तरीय युवा महोत्सव मध्ये खालील स्पर्धा प्रकार घेण्यात आले.

चित्रकला: श्री. संजय आगाशे, श्री. सुभाष धार्मिक, लोकगीत: प्रा. हर्षवर्धन मानकर,, प्रा. डॉ नीरज लांडे, डॉ. सुशील वावरकर ,लोकनृत्य: श्रीमती तृप्ति, डॉ. अर्चना भट्ट, वक्तृत्व व कथालेखन: प्रा. संजय पोहरे, प्रा. आकाश हराल, कविता: श्री अशोक शिरसात, प्रा. संजय पोहरे, विज्ञान व तंत्रज्ञान संकल्पना: प्रा. संजय मोहोड
प्रा. आर. डी. चौधरी यांनी निरीक्षक व परीक्षक म्हणून काम पाहिले.यामध्ये सहभागी शाळांनी उत्कृष्ट विज्ञान प्रदर्शनी लावलेली होती.

सदर कार्यक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे प्राचार्य यांनी सदर हॉल उपलब्ध करून दिला.
माननीय जिल्हाधिकारी श्री.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या करिता जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, जिल्हा संघटक राजेश गावंडे, सुरज कुमारदुबे , निशांत वानखडे, अजिंक्य धेवढे, राजू उगवेकर, गजानन चाटसे, रसिका मेहेसरे तसेंच नेहरू युवा केंद्र चे नेहरू युवा कर्मी सागर चौधरी, व इतर नेहरू युवा कर्मी परिश्रम घेत आहेत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!