Join WhatsApp group

Ads

अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाचे चर्चा सत्र उत्साहात संपन्न

By Sarkarmzanews

August 26, 2026 10:53 am

Ads

मूर्तीजापूर : महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या जयंतीनिमित्त अग्रवाल समाज, मूर्तीजापूरच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी अग्रसेन भवन येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराजा अग्रसेनजी यांच्या ‘एक वीट, एक रुपया’ या सामाजिक समतेच्या सिद्धांताचे स्मरण करून त्यांच्या समानता, बंधुभाव आणि समाजसेवेच्या विचारांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संजय मोजिका यांनी केले.

त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चा सत्राचा उद्देश स्पष्ट केला.यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः युवकांचा सामाजिक उपक्रमांमधील सहभाग वाढविणे, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात समाजाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे, आगामी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन तसेच संघटनात्मक विस्तार याबाबत उपस्थितांनी विचार मांडले.

चर्चासत्राला समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची एकजूट कायम ठेवून महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजसेवेत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उज्ज्वल अग्रवाल यांनी उपस्थित समाजबांधव, पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी अग्रवाल समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!