Join WhatsApp group

Ads

-

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव

By Sarkar Maza

July 14, 2026 1:57 pm

Ads

सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची पूर्वतयारी

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मुर्तिजापूर शहरात पोलीस विभागाच्या वतीने शस्त्र सरावाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सण-उत्सवांच्या काळात बंदोबस्त अधिक प्रभावीपणे राबविणे, संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने आणि तत्परतेने कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे उपस्थित होते. तसेच मुर्तिजापूर विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी ठाणेदार धर्मेंद्र जोशी, ठाणेदार बोरकुटे साहेब, ठाणेदार सुनील वानखळे, ठाणेदार दीपक महाडिक आणि ठाणेदार राठोड साहेब यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या शस्त्र सरावामध्ये विविध आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, या उद्देशाने पोलीस विभागाने ही पूर्वतयारी केली असून, नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Article

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव

शिवणी विमानतळासमोरील अर्धवट उड्डाणपुला विरोधात नागरिकांचा इशारा; ३० जुलैला रास्ता रोको आंदोलन

बोगस बियाणे, खत कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा; आमदार हरिष पिंपळे आक्रमक नियम धाब्यावर ठेवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी;

मुर्तिजापूरात बंदी असलेली स्वीट सुपारी खुलेआम विक्रीला?; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन कारवाई करणार का?

विधानसभेत घुमला शेतकऱ्यांचा आवाज; हरिष पिंपळे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

पक्षांतराच्या अफवा निराधार; विकासकामांसाठीच आमदारांची भेट – वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे स्पष्टीकरण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!